छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पवित्र पुरुषोत्तम मासानिमित्त जालना रोड येथील इस्कॉन वी.ई. सी.सी. मंदिर परिसरात सुरू असलेल्या सात दिवसीय मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथेच्या दुसऱ्या दिवशी भाविकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. विश्वविख्यात प्रवक्ता लालगोविंद दास यांनी आपल्या मधुर वाणीतून उपस्थित हजारो भक्तांना भक्तिरसात तल्लीन केले.
गौडीय भजन आणि अवताराच्या कारणांवर विशेष विवेचन कथेच्या द्वितीय दिवसाची सुरुवात सुमधुर गौडीय भजनांनी झाली. त्यामुळे संपूर्ण पांडाल भक्तिमय आणि दिव्य वातावरणाने भारावून गेला. लालगोविंद दास यांनी कथा पुढे नेत चैतन्य महाप्रभूची ग्रीष्म लीला सुंदररीत्या उलगडून सांगितली. त्यानंतर
त्यांनी प्रभू रामचंद्र यांच्या अवताराची कारणे यावर सविस्तर प्रकाश टाकला. आज रविवारी श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. पांडालमध्ये भगवान श्रीरामांचा भव्य जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र दर्डा उपस्थित होते. तसेच इस्कॉन अन्नामृत, मुंबईचे प्रमुख डॉ. राधाकृष्ण प्रभू, पालिका माताजी, ऋषी बागला, मनोज बजाज यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी
श्रीराम कथा आयोजन समितीचे अध्यक्ष एन. के. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली राजकुमार अग्रवाल, राजेश भारुका, डॉ. विशाल लदनिया, जगदीश अग्रवाल, गोविंद गोयल, विजय गोयल, रुक्मिणी रमण प्रभू आणि इतर सर्व सदस्य सेवाभावाने कार्यरत आहेत. कथा दररोज दुपारी ४.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत इस्कॉन वी.ई.सी.सी. निर्माणाधीन मंदिर, वरुड फाटा, जालना रोड येथे घेण्यात येत असून भाविकांनी कथेचा लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://epaper.sanjwarta. Powered By: Vrudhee Solutions